बीबीसीचे न्यूज प्रेझेंटर अँड्र्यू नील यांचा २० वर्षीय तरुणीसोबत विवाह

ज्येष्ठ स्कॉटिश न्यूज प्रेझेंटर अँड्र्यू नील यांचं अभिनंदन करणारे मॅसेजेस सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. ६६ वर्षीय अँड्र्यू नील यांनी नुकताच २० वर्षीय तरुणीशी विवाह केलाय. 

Updated: Aug 16, 2015, 04:44 PM IST
बीबीसीचे न्यूज प्रेझेंटर अँड्र्यू नील यांचा २० वर्षीय तरुणीसोबत विवाह title=

फ्रान्स: ज्येष्ठ स्कॉटिश न्यूज प्रेझेंटर अँड्र्यू नील यांचं अभिनंदन करणारे मॅसेजेस सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहेत. ६६ वर्षीय अँड्र्यू नील यांनी नुकताच २० वर्षीय तरुणीशी विवाह केलाय. 

नील यांनी ट्विटरवर 'स्वीडनची इंजीनिअर' अशी ओळख देत शनिवारी सकाळी 'सिक्रेट्स आऊट' या कॅप्शनसह फोटो पोस्ट केलाय. दक्षिण फ्रान्समध्ये हे जोडपं नुकतंच विवाहबद्ध झालं.

'बॅचरल ऑफ फ्लीट स्ट्रीट' म्हणजेच फ्लीट स्ट्रीटचे पदवीधर अशी ओळख असलेल्या नील यांनी पत्रकारीतेत एक अर्थशास्त्री म्हणून १९८३ ते १९९४ पर्यंत ११ वर्ष काम केलं. अजूनही ते मर्डोक इम्पायरसाठी काम करत आहेत. त्यांनी यूके साठी सिम्पसन्स आणले आणि ते स्कॉय टिव्हीचे एक आधारस्तंभ आहेत. 

सध्या ते बीबीसीला पॉलिटिकल शोजचे अँकर आहेत. त्यांच्या विवाहानंतर सोशल मीडियावर त्यांनी शेअर केलेले फोटो, अभिनंदनासह चांगलेच वायरल झालेत.  

यावर्षी १ जानेवारीला २२ वर्षीय तरुणीसोबत विवाह करणारे ठाण्याचे सतीश आपटे, त्यांच्या लग्नाचा फोटोही सोशल मीडियावर वायरल झाला होता. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.