मुंबई : बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी उद्योगपतींसोबत लग्न केले आहे. त्यामध्ये आता असीनचीही भर पडली आहे.
या १० अभिनेत्रींनी केलं उद्योगपतींसोबत लग्न :
१. असीन : अभिनेत्री असिन ही येत्या २३ जानेवारीला मायक्रोमॅक्सचे सीईओ राहुल शर्मा यांच्यासोबत विवाह बंधनात अडकणार आहे.
२. डिंपी गांगुली : बिग बॉसच्या सिझन - ८ मध्ये झळकलेली डिंपी गांगुली हिने दुबईतील उद्योगपती रोहित रॉय यांच्यासोबत २७ नोव्हेंबरला लग्न केलं. त्या अगोदर तिने राहुल महाजनसोबत स्वयंवरमध्ये लग्न केलं होतं.
३. टीना अंबानी : १९८० च्या काळात ती प्रसिध्दीत आलेल्या टीना मुनीम यांनी अनिल अंबानींसोबत लग्न केले.
४. दिया मिर्झा : दिया मिर्झा हिनेही बिझनेसमन साहिल संघ यांच्यासोबत १८ ऑक्टोबर २०१४ ला लग्न केलं.
५. आयेशा टाकिया : अभिनेत्री आयेशा टाकियाने हॉटेल व्यावसायिक फरहान आझ्मी यांच्यासोबत लग्न केले.
६. इशा देओल : हेमामालिनी यांची मुलगी बिझनेसमन भारत ताकतानीसोबत २०१२ मध्ये विवाह बंधनात अडकली.
७. रविना टंडन : रविना टंडनने फिल्म डिस्ट्रिब्युटर अनिल थडानीसोबत फेब्रुवारी २००४ मध्ये विवाह केला.
८. शिल्पा शेट्टी : शिल्पा शेट्टीने लंडनमधील अद्योजक राज कुंद्रा यांच्यासोबत २००९ मध्ये विवाह केला.
9. जुही चावला : बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री जुही चावला हिने जय मेहता या उद्योजकाशी लग्न केले आहे.
१०. अम्रीता अरोरा : अम्रीता अरोरा यांनी बिल्डर शकिल लदाख यांच्याशी विवाह केला.