५ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने

 सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. 

Updated: Oct 5, 2015, 11:48 AM IST
५ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने title=

मुंबई :  सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. 

फिल्म रिव्ह्यू : सिंग इज ब्लिंग : कॉमेडी आणि अॅक्शनचा अक्षय तडका!

पहिल्या दिवशी या चित्रपटाने २०.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर शनिवारी त्याने १४.५० कोटींची कमाई केली. देशात या चित्रपटाने दोन दिवसात ३५.१७ कोटींची कमाई केली आहे. शनिवारी या चित्रपटाचा गल्ला जरा कमी झाला. पण ३५.१७ कोटी कमाईसह अक्षयच्या सिंग इज ब्लिंगने बॉक्स ऑफिसवर ५ रेकॉर्ड प्रस्थापित केले. 

१) २०१५ मध्ये अक्षयची बेस्ट ओपनिंग! 
अक्षय कुमारने या वर्षात चार चित्रपट केले आहे. ब्रदर्सने  यात १५ कोटींचा ओपनिंग गल्ला जमविला होता, हा दिवस १५ ऑगस्ट म्हणजे सुट्टीचा दिवस होता. त्यानंतर गब्बरने १३ कोटींचा गल्ला जमविला होता. त्यानंतर बेबी या चित्रपटाने ९ कोटी कमाविले होते. पण सिंग इज ब्लिंगने आतापर्यंत सर्वात मोठी ओपनिंग केली आहे. 

२) अक्षयच्या चित्रपटाची सर्वात मोठी ओपनिंग 
अक्षयच्या आतपर्यंतच्या चित्रपटात त्याला सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे. यापूर्वी ब्रदर्सने १५.२५ कोटी आणि त्यापूर्वी रावडी राठोडला १५.१० कोटींची ओपनिंग मिळाली होती. 

३) २०१५ मधील दुसरी हायस्ट ओपनिंग 
बजरंगी भाईजानने धुमाकूळ घातल्यानंतर दुसऱ्या स्थानावर अक्षय कुमारचा ब्रदर्स हा चित्रपट होता. पण आता सिंगने ब्रदर्सला पाठी टाकत दुसरा क्रमांक मिळविला आहे. 

४) सुट्टीच्या दिवशी दुसऱ्या क्रमांकाची कमाई 
यापूर्वी बजरंगी भाईजान याने सुट्टीच्या दिवशी २७ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर आता अक्षयच्या सिंग इज ब्लिंगने २० कोटींची कमाई केली आहे. बजरंगी हा ईदला रिलीज झाला होता. सिंग इज ब्लिंग गांधी जयंतीला रिलीज झाला आहे. 

५) प्रभूदेवाच्या चित्रपटाला हायस्ट ओपनिंग
यापूर्वी प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेला वॉन्टेड या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली. त्यानंतर रावडी राठोडने कमाई केली होती. आता त्यानंतर सिंग इज ब्लिंग याने सर्वाधिक कमाई केली आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.