आमिरची भावना योग्यच; मीही ठरलोय असहिष्णुतेचा शिकार - रहमान

सध्या उठलेल्या असहिष्णुतेच्या वादात आता ऑस्कर विजेता ए आर रहमान यांनीही उडी घेतलीय. आमिरनं जी भीती व्यक्त केलीय तिचा सामना मलाही करावा लागलाय, असं रहमान यांनी म्हटलंय. आमिरच्या भावनाशी आपण सहमत असून त्यासाठी हिंसक प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं रहमाननं नमूद केलंय... सोबतच, या विषयावर आणखीन बोलायला लावून मला अडचणीत टाकू नका अशी विनवणीही त्यांनी यावेळी केली.

Updated: Nov 25, 2015, 05:10 PM IST
आमिरची भावना योग्यच; मीही ठरलोय असहिष्णुतेचा शिकार - रहमान  title=

पणजी : सध्या उठलेल्या असहिष्णुतेच्या वादात आता ऑस्कर विजेता ए आर रहमान यांनीही उडी घेतलीय. आमिरनं जी भीती व्यक्त केलीय तिचा सामना मलाही करावा लागलाय, असं रहमान यांनी म्हटलंय. आमिरच्या भावनाशी आपण सहमत असून त्यासाठी हिंसक प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं रहमाननं नमूद केलंय... सोबतच, या विषयावर आणखीन बोलायला लावून मला अडचणीत टाकू नका अशी विनवणीही त्यांनी यावेळी केली.

अधिक वाचा - तुमचा विरोध आमिरच्या विधानांना बळकटीच देतोय - शरद पवार

अधिक वाचा - 'इडियट रणछोडदास'वर शिवसेनेचा हल्लाबोल!

अधिक वाचा - अक्षय कुमार आमिरच्या वक्तव्यावर काय म्हणतोय...

दोन महिन्यांपूर्वी मुंबईच्या रजा अकादमीनं इरानी सिनेमा 'मोहम्मद : मॅसेंजर ऑफ गॉड' या सिनेमाला संगीत दिल्यानं रहमान यांच्याविरुद्ध फतवा काढला होता. अशा सिनेमांमुळे प्राफेटचा अपमान होतो, हा सिनेमा इस्मामची निंदा करतो, असा आरोप रजा अकादमीनं केला होता. यानंतर दिल्ली आणि उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ए आर रहमान यांची आयोजित कॉन्सर्ट तडकाफडकी रद्द केली होती. याच दरम्यान, विश्व हिंदू परिषदेनं रहमान यांच्याकडे धर्म परिवर्तन करून 'घर वापसी'ची मागणी केली होती. 

अधिक वाचा - आमिरचं जरा अतिच झालं - मिल्खा सिंह

अधिक वाचा - 'मुस्लिमांसाठी भारतासारखी दुसरी जागा नाही'

'पुरस्कारवापसी'च्या विषयावर बोलताना, शिवाय रहमानच्या मते पुरस्कार परत करण्याचा पर्याय हा निषेध व्यक्त करण्याचा सर्वात योग्य मार्ग आहे... असं त्यांनी म्हटलंय. हा मार्ग आपल्याला काव्यात्मक वाटतो, कारण त्यांची प्रकृती अहिंसक आहे, आपला निषेध व्यक्त करताना कोणत्याही प्रकारची हिंसा होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असंही रहमान यांनी म्हटलंय. रहमान काल संध्याकाळी गोव्यात एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलत होते.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.