ए. आर. रेहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत

दोन ऑस्कर जिंकणारा भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत आला आहे. परंतु येथे रेहमान एकटाच नाही आहे. चित्रपट निर्माता गिरीश मलिक यांची राष्ट्रीय पुरस्कार विजेता फिल्म 'जल' देखील ऑस्करमध्ये बेस्ट पिक्चर आणि बेस्ट ओरिजनल स्कोरसाठी नामांकीत झाली आहे.

Updated: Dec 15, 2014, 08:30 PM IST
ए. आर. रेहमान पुन्हा ऑस्करच्या शर्यतीत title=

मुंबई : दोन ऑस्कर जिंकणारा भारतीय संगीतकार ए. आर. रेहमान पुन्हा एकदा ऑस्करच्या शर्यतीत आला आहे. परंतु येथे रेहमान एकटाच नाही आहे. चित्रपट निर्माता गिरीश मलिक यांची राष्ट्रीय पुरस्कार विजेता फिल्म 'जल' देखील ऑस्करमध्ये बेस्ट पिक्चर आणि बेस्ट ओरिजनल स्कोरसाठी नामांकीत झाली आहे.

८७ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी ओरिजनल स्कोरसाठी ११४  जणांचे नामांकन आहे. याच नामांकनात एक नाव रेहमानचं देखील आहे.  जारी केलेल्या यादीत मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सचा 'मिलियन डॉलर आर्म', 'द हंड्रेड फीट जर्नी' आणि भारतीय फिल्म 'कोच्चाडियन'चा समावेश आहे. शुक्रवारी या लिस्टला अॅकॅडमीच्या वेबसाइटवर ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

रेहमानने यापूर्वी डैनी बॉयल ची फिल्म 'स्लमडॉग मिलेनियर' साठी अॅकॅडमी पुरस्कार जिंकून संपूर्ण देशाला गौरवित केलं होतं.
ऑस्कर पुरस्काराच्या नामांकीत चित्रपटांच्या यादी येत्या 15 जानेवारीला करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा 22 फेब्रुवारीला हॉलीवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.