नग्न पोस्टरमुळे २२७ रूपयांची किंमत दीड कोटी

पीके चित्रपटात वापरण्यात आलेल्या आमीर खानच्या नग्न पोस्टरची मोठी चर्चा झाली, यातील रेडिओलाही यामुळे मोठी किंमत आली आहे. एका इंग्रजी न्यूज पेपरने दिलेल्या बातमीनुसार या रेडिओची ऑनलाईन बोली लावण्यात आली, यात दीड कोटी रूपयांना हा रेडिओ घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. बातमीत दिलेल्या माहितीनुसार हा रेडिओ २२७ रूपयांना मुंबईतल्या चोरबाजारातून विकत घेण्यात आला.

Updated: Dec 8, 2014, 02:15 PM IST
नग्न पोस्टरमुळे २२७ रूपयांची किंमत दीड कोटी title=

मुंबई : पीके चित्रपटात वापरण्यात आलेल्या आमीर खानच्या नग्न पोस्टरची मोठी चर्चा झाली, यातील रेडिओलाही यामुळे मोठी किंमत आली आहे. एका इंग्रजी न्यूज पेपरने दिलेल्या बातमीनुसार या रेडिओची ऑनलाईन बोली लावण्यात आली, यात दीड कोटी रूपयांना हा रेडिओ घेण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. बातमीत दिलेल्या माहितीनुसार हा रेडिओ २२७ रूपयांना मुंबईतल्या चोरबाजारातून विकत घेण्यात आला.

चित्रपटाच्या प्रवक्त्याने या बातमीला दुजोरा दिला आहे.  या रेडिओला पैशांच्या मोठ्या प्रमाणात ऑफर मिळाल्या आहे, मात्र हा ट्रांझिस्टर विकण्याची कल्पना आमीर खानला चांगली वाटली नाही. एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार, आमीरला वाटतंय त्याच्या भूमिकेशी संबंधित महत्वपूर्ण वस्तूला कुणालाही देण्यात येऊ नये.

एकीकडे मार्केटिंग टीम आमीर खानचं मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्री अनुष्का शर्माने आमीर खान आणि दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी हा रेडिओ सांभाळून ठेवण्याची विनंती केली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.