BOX OFFICE: कमाईच्या बाबतीत ‘पीके’नं चेन्नई ‘एक्सपेस’ला टाकलं मागे

आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चा विरोध दिवसेंदिवस वाढतोय. मात्र तरीही ही फिल्म रोज नवनवीन रेकॉर्ड बनवतेय.

Updated: Dec 30, 2014, 11:38 AM IST
BOX OFFICE: कमाईच्या बाबतीत ‘पीके’नं चेन्नई ‘एक्सपेस’ला टाकलं मागे title=

मुंबई: आमिर खानचा चित्रपट ‘पीके’चा विरोध दिवसेंदिवस वाढतोय. मात्र तरीही ही फिल्म रोज नवनवीन रेकॉर्ड बनवतेय.

आपण वर्ल्डवाइड कलेक्शन पाहिलं तर ‘पीके’नं ‘चेन्नई एक्सप्रेस’ला मागे टाकत नंबर दोनवर स्थान मिळवलंय. बॉलिवूड साइट koimoi नुसार ‘पीके’नं वर्ल्ड वाइड ४३३.५ कोटींची कमाई केलेली आहे. 

तर ‘चेन्नई एक्सप्रेस’चं वर्ल्डवाइड कलेक्शन ४२२ कोटी होतं. ज्याला पीकेनं मागे टाकलंय. आता पीकेच्या पुढे आमिरचीच फिल्म ‘धूम ३’आहे. 

‘धूम ३’नं ५४२ कोटींची कमाई केली होती. पीके लवकरच धूम ३चा रेकॉर्ड मोडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. पीकेनं अवघ्या १० दिवसांत भारतात बॉक्स ऑफिसवर २३६.५ कोटींची कमाई केलीय. 

विशेष म्हणजे वर्ल्डवाइक कमाई करणाऱ्या टॉप ५ फिल्ममध्ये आमिरच्या ३ चित्रपटांचा समावेश आहे. बॉक्स ऑफिस एक्सपर्ट्सच्या मते चित्रपटानं घरगुती बॉक्स ऑफिसवर जर ३०० कोटींची कमाई केली तर ३००च्या क्लबमधील ‘पीके’ पहिली फिल्म ठरेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.