'आभाळमाया'च्या मायेची 16 वर्ष

'आभाळमाया'... काही वर्षांपूर्वी या मालिकेनं छोट्या पडद्यावर एकच धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांच्या मनाचा योग्य तो ठाव घेऊन अनेक पिढ्यांनी एकत्र पाहिलेल्या या मालिकेनं नुकतीच 16 वर्ष पूर्ण केलीत.

Updated: Nov 11, 2015, 08:44 PM IST
'आभाळमाया'च्या मायेची 16 वर्ष title=

मुंबई : 'आभाळमाया'... काही वर्षांपूर्वी या मालिकेनं छोट्या पडद्यावर एकच धुमाकूळ घातला होता. प्रेक्षकांच्या मनाचा योग्य तो ठाव घेऊन अनेक पिढ्यांनी एकत्र पाहिलेल्या या मालिकेनं नुकतीच 16 वर्ष पूर्ण केलीत.


फाईल फोटो

याच निमित्तानं 'ट्री प्रोडक्शन हाऊस'च्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. साधे, सोपे, सरळ डायलॉग आणि स्टोरी सांगण्याची पद्धत यासोबतच कलाकारांचं भूमिकेत विरघळून जाणं या गोष्टींमुळे या मालिकेनं एकेकाळी लोकप्रियतेची उंची गाठली होती.  

मराठी टीव्ही सीरियल जगतातील हा एक माईलस्टोन म्हणून ओळखला जातो. 'अल्फा मराठी' (आत्ताचं झी मराठी) या चॅनलवर ही मालिका प्रदर्शित केली जात होती. सुकन्या मोने, परी तेलंग, ऋतुजा देशमुख, अविनाश दर्व्हेकर यांच्या प्रमुख भूमिका या मालिकेत पाहायला मिळाल्या. 

'आभाळमाया'चं टायटल साँग आत्तापर्यंत कित्येकांच्या मनात रुंजी घालतंय... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.