अभिषेक - ऐश्वर्या एकमेकांसमोर उभे ठाकणार...

बॉलिवूडचं सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... या दोघांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असलं तरी लवकरच अभिषेक-ऐश्वर्या एकमेकांच्या समोरासमोर उभं ठाकणार असल्याचं समजतंय. 

Updated: Jan 24, 2015, 05:42 PM IST
अभिषेक - ऐश्वर्या एकमेकांसमोर उभे ठाकणार...

मुंबई : बॉलिवूडचं सर्वात चर्चेतलं जोडपं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन... या दोघांना एकत्र पाहणं त्यांच्या चाहत्यांना नेहमीच आवडत असलं तरी लवकरच अभिषेक-ऐश्वर्या एकमेकांच्या समोरासमोर उभं ठाकणार असल्याचं समजतंय. 

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन 'जज्बा' या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत कमबॅक करतेय. यानंतर ऐश्वर्यानं करण जोहरचाही एक सिनेमा स्वीकारलाय. 'ये दिल है मुश्किल' या करण जोहरच्या सिनेमात ऐश्वर्या रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्यासोबत काम करणार आहे.  हा सिनेमा पुढच्या वर्षी ३ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 
 
तर, अभिनेता अभिषेक बच्चन साजिद-फरहाद यांच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या 'हाऊसफुल्ल ३' या सिनेमात करतोय. हा सिनेमादेखील ३ जून रोजीच प्रदर्शित होणार असल्याचं समजतंय. या सिनेमात अभिषेकसोबत अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हेदेखील दिसतील. 

एकाच दिवशी अभि-अॅशचे वेगवेगळे सिनेमे प्रदर्शित होत असले तरी प्रेक्षक कोणत्या सिनेमाला अधिक प्रतिसाद देतायत हे पाहणं औत्सुक्याचं ठरतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.