मुंबई : फक्त २० मिनिटांच्या सिनेमासाठी एका भारतीय अभिनेत्याने ३० कोटी रुपये वसूल केले आहेत. या अभिनेत्याचं नाव आहे प्रभास. तो दक्षिणातील सुपरस्टार आहे. प्रभासचा लवकरच 'बाहुबली 2' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बाहुबली सिनेमाला अनेकांनी पसंदी दिली होती. बाहुबलीचा सिक्वेल १४ एप्रिल रिलीज होणार आहे. पण त्याआधी प्रभासने एक असा धमाका केला जो आतापर्यंत कोणीच केला नाही.
प्रभास एक २० मिनिटांचा सिनेमा करणार आहे. पण २० मिनिटांच्या या सिनेमासाठी प्रभासने जेवढी रक्कम मागितली ते ऐकून दिग्दर्शकाची झोपच उडाली.
प्रभासने दिग्दर्शककडे ३० कोटी रुपये मागितले. त्याची प्रसिद्धी पाहता दिग्दर्शकाने ही ३० कोटी रुपये दिले. हा सिनेमा हिंदी, तमिळ आणि तेलगू या तीन भाषेमध्ये बनवली जाणार आहे. सिनेमामध्ये भरपूर अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहे. या सिनेमाची खासियत ही आहे की, या सिनेमासाठी हॉलिवुडमधील दिग्दर्शक केनी बेटीज यांची मदद घेतली जाणार आहे. केनीने 'डाई हार्ड' आणि 'ट्रास्फॉर्मर्स' सारखे सिनेमे केले आहेत. त्यामुळे या सिनेमात अनेक जबरदस्त अॅक्शन सीन पाहायला मिळतील.