मुंबई : किंग खान शाहरुख खानची ईडीकडून चौकशी करण्यात आली. ईडीकडून तब्बल तीन तास शाहरुखची चौकशी करण्यात आली. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही चौकशी करण्यात आली.
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स टीम खरेदीप्रक्रियेत परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शाहरुख खानची चौकशी केली. चौकशीत शाहरुखने नियमांचे उल्लंघन झालेले नाही, असा दावा केलाय.
आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे मालकी अधिकार शाहरुखच्या रेड चिलीजकडे आहे. यात जुही चावलाचापती जय मेहता यांचीही भागीदारी आहे. शाहरुखने नाइट रायडर्सचे शेअर ६ ते ८ पट कमी किंमतीत विकल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ईडीने शाहरुख खानला तीन वेळा समन्स बजावला होता. मात्र तो उपस्थित राहिला नव्हता.
ईडीने शाहरुखची तीन तास चौकशी केली. शाहरुखने चौकशीत सहकार्य केले असून त्याने खरेदीप्रक्रियेतील काही कागदपत्रही ईडीसमोर सादर केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.