राहत्या घरी अभिनेत्री शिखा जोशी आढळला मृतदेह, आत्महत्येचा संशय

वर्सोव्यात एका मॉडेलचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलाय. रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह या मॉडेलच्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी आढळून आलाय. 

Updated: May 18, 2015, 12:02 AM IST
राहत्या घरी अभिनेत्री शिखा जोशी आढळला मृतदेह, आत्महत्येचा संशय title=

मुंबई: वर्सोव्यात एका मॉडेलचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळलाय. रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह या मॉडेलच्या वर्सोव्यातल्या राहत्या घरी आढळून आलाय. 

शिखा जोशी असं या मॉडेलचं नाव आहे. तिच्या गळ्यावर वार करण्यात आल्याचंही आढळलंय. गेल्या काही दिवसांपासून शिखा तणावात वावरत होती असं तिच्या एका मैत्रिणीनं सांगितलंय. पोलीस या प्रकरणी तपास करतायत.  

धारदार शस्त्रानं गळा चिरून तिनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिखाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, रुग्णालयात आणण्यापूर्वीच तिच्या मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. 
 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.