झरीनने उघड केले बोल्ड सीन्सचे गुपीत...

 आगामी चित्रपट 'हेट स्टोरी ३' अभिनेत्री झरीन खानने बोल्ड सीनच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. त्यामुळे सध्या ती खूप चर्चेत आहे. झरीनने पहिला चित्रपट 'वीर'मध्ये आपल्या सोजवळ रूपाने सर्वांना वेडं केलं होते पण आता त्याच्या मादक अदांनी लोकांना हैराण केले आहे. 

Updated: Nov 20, 2015, 09:31 PM IST
झरीनने उघड केले बोल्ड सीन्सचे गुपीत...  title=

मुंबई :  आगामी चित्रपट 'हेट स्टोरी ३' अभिनेत्री झरीन खानने बोल्ड सीनच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहे. त्यामुळे सध्या ती खूप चर्चेत आहे. झरीनने पहिला चित्रपट 'वीर'मध्ये आपल्या सोजवळ रूपाने सर्वांना वेडं केलं होते पण आता त्याच्या मादक अदांनी लोकांना हैराण केले आहे. 

मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार झरीन खानने आपल्या या बोल्ड सीन्समागे घरातील एका व्यक्तीचा हात असल्याचे सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत झरीन म्हणाले, की आपल्या आईच्या सांगण्यावरून या चित्रपटाला होकार दिला. या चित्रपटाला होकार द्यावा की नाही या संदर्भात खूप दविधा मनस्थितीत होते. पण आईशी बोलल्यानंतर माझ्यात आत्मविश्वास वाढला. माझ्यासाठी आईचं मत खूप मोठे वाटते. मी तिच्याशी यासंदर्भात बोलली त्यावर ती म्हणाली यात काही मोठी गोष्ट नाही. आजकाल प्रत्येक चित्रपटात असे सीन्स दिले जातात. त्यामुळे आईचे हे म्हणणे ऐकून मला धैर्य आले आणि मी हे बोल्ड सीन करू शकली असे झरीनने म्हटले आहे. 

झरीन म्हटली की आजकाल प्रत्येक चित्रपटात किसींग सीन पाहायला मिळतो. आम्ही ज्या पद्धतीने 'हेट स्टोरी ३'मध्ये चित्रित केला आहे तो बोल्ड वाटतो आहे. 

या चित्रपटात झरीन खान, करण सिंग ग्रोवर, शरमन जोशी आणि डेजी शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत, यात अनेक इंटिमेट सीन्स आहेत. या चित्रपटातील वजह तुम ही हो हे गाणे नुकतेच रिलीज झाले. त्याल करण सिंग ग्रोवर आणि झरीन खान यांनी खूप बोल़्ड सीन्स आणि लिपलॉक सीन्स दिले आहेत. हा चित्रपट ११ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.