कट्यारचे कोटी कोटीची उड्डाणे

सुबोध भावे दिग्दर्शीत आणि झी स्टुडिओज निर्मिती 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने गेल्या आठ दिवसात ७ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने यांनी  दिली. 

Updated: Nov 20, 2015, 08:19 PM IST
कट्यारचे कोटी कोटीची उड्डाणे  title=

मुंबई : सुबोध भावे दिग्दर्शीत आणि झी स्टुडिओज निर्मिती 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने गेल्या आठ दिवसात ७ कोटी रूपयांचा व्यवसाय केला असल्याची माहिती झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने यांनी  दिली. 

आपल्या संगीताने आणि भव्य-दिव्यतेने प्रेक्षकांना भूरळ घालणाऱ्या या चित्रपटाने गेल्या कित्येक दिवसात मराठी चित्रपटाने केला नाही इतका व्यवसाय केला आहे. यापूर्वी झीच्या 'लई भारी' या चित्रपटाने सर्वाधिक ४० कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे. त्यानंतर 'टाइमपास' ३२ कोटी,  'दुनियादारी' २५ कोटी , टाइमपास२ ने २५ कोटींच्या आपसाप व्यवसाय केला आहे. 

कट्यारने गेल्या आठ दिवसात ७ कोटींच्या पुढचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आता या झी च्या कोणत्या चित्रपटाला मागे टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वेगळाच विक्रम 
 'कट्यार' पहिल्या आठवड्यात २२० थिएटरमध्ये लागला होता. त्याचे एकूण ३४७२ शो होते. पण नवीन विक्रम करत दुसऱ्या आठवड्या ३०८ थिएटरमध्ये याने धडक मारली असून एकूण शो ३९०० आसपास झाले आहेत. 
या चित्रपटाला महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश हैदराबाद येथे  हाऊसफूल प्रतिसाद आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.