मुंबई : संजय गुप्ता दिग्दर्शित 'जज्बा' या सिनेमातून कमबॅकसाठी ऐश्वर्या राय-बच्चन सज्ज आहे... पण, सध्या सुरू असलेल्या आयपीएलनं मात्र ऐश्वर्याची चांगलीच अडचण झालीय.
ऐश्वर्याच्या पुन्हा एकदा होणाऱ्या 'कमबॅक'ची प्रेक्षकही वाट पाहत आहेत. पण, ऐश्वर्याच्या 'जज्बा' या सिनेमाचं शूटींग आयपीएल फिव्हरमुळे पुढे ढकलण्यात आलंय.
त्याचं झालं असं की, 'जज्बा' या सिनेमातील काही प्रसंग वानखेडे स्टेडियममध्ये शूट करण्यात येणार होते. यासाठी, रितसर परवानगीही घेण्यात आली होती. मात्र, याच दिवशी मुंबई इंडियन्स आणि किंग इलेव्हन पंजाब यांच्यात वानखेडेवर स्टेडियमवर सामन्याचंही आयोजन करण्यात आलंय. साहजिकच, जज्बाचं शूटींग थांबवण्यात आलं. त्यामुळे, आयपीएलचा फटका ऐश्वर्याला बसलाय, असं म्हणायला हरकत नाही.
'जज्बा' या सिनेमात ऐश्वर्यासोबतच इरफान खान, शबाना आजमी आणि जॅकी श्रॉफ अशी तगडी स्टारकास्ट आहे. ९ ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.