मुंबई : अक्षय कुमारने हाऊसफूल चित्रपटाच्या सेटवर एका माकडाला कानाखाली लगावली होती. 'शौकीन्स'च्या सेटवर अनुपम खेरला लगावली होती आता 'गब्बर' चित्रपटाच्या सेटवर आता एका फॅनच्या कानाखाली लगावली. अक्षय कुमारने आता स्लॅप सीरिजचा नवा रेकॉर्ड बनविला आहे.
पहिल्या दोन कानाखाली या स्क्रिप्टची डिमांड होती. पण नवं प्रकरण प्रायव्हसीची डिमांड होती म्हणून लगावली आहे.
या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार 'गब्बर' चित्रपटाच्या शुटींगवेळी अक्षय कुमारने एका फॅनला कानाखाली लगावली. हा व्यक्ती शुटिंग झोन क्रॉस करून चोरीने अक्षयचे फोटो काढण्याचा प्रयत्न करीत होता.
एखाद्या बॉलिवूड ताऱ्याने आपल्या अति उत्साही फॅनला कानाखाली लगावल्याचा हा पहिला प्रकार नाही. विजयवाडा येथील एका शो रूमच्या उद्घाटनावेळी जेनेलियाने फॅनने विचित्र हरकत केल्याने कानाखाली लगावली होती. सलमान खानने आपल्या फॅनचा मोबाईल फेकून दिला होता. मुंबईत कुलाबा भागात प्रियंका चोपडाने आपल्या फॅनच्या गैरवर्तणुकीवर कानाखाली लगावली होती. मनी है तो हनी है च्या सेटवर गोविंदानेही असा कारनामा केला होता.
अक्षय कुमार आणि श्रुती हासन स्टारर 'गब्बर' ३ एप्रिल २०१५ मध्ये रिलीज झाला. हा तमिळ चित्रपट 'रामन्ना'चा रिमेक आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.