शहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आदर्श घ्यावा असंच काही केलं आहे. अभिनेत्यापेक्षा तो एक चांगला व्यक्ती आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एकीकडे उडी दहशतवादी हल्ल्यावर शहिदांना अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने ५ ते १० लाखांपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

Updated: Sep 28, 2016, 01:18 PM IST
शहिदांच्या कुटुंबियांना अक्षय कुमारची आर्थिक मदत title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याने पुन्हा एकदा आदर्श घ्यावा असंच काही केलं आहे. अभिनेत्यापेक्षा तो एक चांगला व्यक्ती आहे हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. एकीकडे उडी दहशतवादी हल्ल्यावर शहिदांना अनेक जण श्रद्धांजली वाहत आहेत तर दुसरीकडे अभिनेता अक्षय कुमारने शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत केली आहे. अक्षय कुमारने ५ ते १० लाखांपर्यंत शहिदांच्या कुटुंबियांना मदत केली आहे.

अक्षय कुमारने म्हटलं की, 'शहिदांच्या कुटुंबियांना मेडल आणि अॅवॉर्ड देणे चांगलं आहे पण पुरेसं नाही नाही. त्यांच्या कुटुंबियांसाठी खूप काहीतरी करण्याची गरज आहे आणि आवश्यकता ही.

अक्षय कुमारने याआधी देखील महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली होती. अक्षयचं हे काम निश्चितच कौतूकास्पद आणि आदर्श घेण्यासारखे आहे. शहिदांच्या कुटुंबियांनी अक्षय कुमारचे आभार मानले आहेत. अनेकांनी श्रद्धांजली आणि कुटुंबियांचं सांत्वन केलं पण अक्षय कुमारचं हे पाऊल तो एक चांगला व्यक्ती असल्याचं नेहमीच दाखवून देतो.