अक्षयचा रुस्तम 100 कोटी पार

बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल 100 कोटींचा पल्ला पार केलाय. नऊ दिवसांत या चित्रपटाने तब्बल 101 .08 कोटींची कमाई केलीये. 

Updated: Aug 21, 2016, 09:44 PM IST
अक्षयचा रुस्तम 100 कोटी पार title=

मुंबई : बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारच्या रुस्तम या चित्रपटाने तिकीटबारीवर तब्बल 100 कोटींचा पल्ला पार केलाय. नऊ दिवसांत या चित्रपटाने तब्बल 101 .08 कोटींची कमाई केलीये. 

कमी दिवसांत 100 कोटींचा क्लबमध्ये प्रवेश करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रुस्तम दुसऱ्या स्थानावर आहे.पहिल्या स्थानावर सलमानचा सुल्तान तर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अक्षयचाच एअरलिफ्ट आणि हाऊसफुल्ल 3 हा सिनेमा आहे. 

रुस्तमने शनिवारी 100 कोटींचा आकडा पार केला. पहिल्या आठवड्यात रुस्तमने 50.42 कोटींची कमाई केली. रुस्तमच्या लाटेपुढे मात्र हृतिक रोशनचा मोहंजोदडो आणि हॅप्पी भाग जायेगी या सिनेमांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.