अक्षय कुमारच्या बॉडिगार्डचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू

अभिनेता अक्षय कुमारचा बॉडिगार्ड म्हणून काम करणाऱ्या मनोज शर्मा यांचा धावत्या ट्रेनखाली येऊन मृत्यू झालाय. 

Updated: Dec 14, 2016, 03:53 PM IST
अक्षय कुमारच्या बॉडिगार्डचा धावत्या रेल्वेखाली मृत्यू title=

मथुरा : अभिनेता अक्षय कुमारचा बॉडिगार्ड म्हणून काम करणाऱ्या मनोज शर्मा यांचा धावत्या ट्रेनखाली येऊन मृत्यू झालाय. 

२७ मनोज शर्मा हा मुळचा आग्र्याचा रहिवासी होता. एका आठवड्याच्या सुट्ट्या संपवून तो मुंबईला परतण्याच्या तयारीत होता. यासाठीच तो आग्र्याहून मथुरापर्यंत दाखल झाला होता. परंतु, मध्येच हा अपघात घडला आणि यात मनोज जागीच ठार झाला. 
 
रेल्वे जवळपास दीड तास उशिरानं धावत होती. चालत्या गाडीतून उतरण्याच्या नादात मनोजचा तोल गेला आणि तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मधल्या जागेत अडकला... यात त्याला जागीच मृत्यू झाला. 

रेल्वे पोलिसांना मिळालेल्या कपडे आणि ओळखपत्रावरून मनोजच्या मृतदेहाची ओळख पटू शकली. रेल्वे पोलिसांनी शव पोस्टमॉर्टेमसाठी धाडलंय. 

सध्या, अक्षय कुमार गेल्या दीड महिन्यापासून मथुराच्या नंदगाव आणि बरसाना या भागांत आपल्या आगामी 'टॉयलेट : एक प्रेम कथा' या सिनेमाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.