दंगल चित्रपटातून आमिर खानला किती कोटींची कमाई ?

 दंगल चित्रपटातून आमिर खानने 175 कोटींची कमवल्याची बातमी हाती आली आहे. 

Updated: Mar 20, 2017, 05:20 PM IST
दंगल चित्रपटातून आमिर खानला किती कोटींची कमाई ? title=

नवी दिल्ली :  दंगल चित्रपटातून आमिर खानने 175 कोटींची कमवल्याची बातमी हाती आली आहे. 

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नोटबंदीच्या काळातही भरपुर कमाई केली. भारतातच नाही तर परदेशातही दंगलने चांगलाच गल्ला जमवला.

याचा बराच आर्थिक फायदा निर्माता आणि अभिनेता आमिर खानला झालाय. या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या आणि तो सर्व अपेक्षांवर खरा उतरला. 

इतकंच नाही तर हा चित्रपट यापुढेही जी कमाई करेल त्यातूनही त्याला 33 टक्के वाटा मिळणार आहे. हा भाग सॅटेलाईट राईट्सचा असेल.

हा चित्रपट समाजात असलेल्या लिंगभेदाविषयी चर्चा करतो. आमीर खानचा चित्रपट म्हणजे सामाजिक विषय आणि तरीही बॉक्स ऑफीसवर मजबुत कमाई हे गणित ठरलेलं असतं.