मल्लिकाला व्हायचं होतं आमिरची पत्नी!

बॉलिवूडचा 'मि. परफेक्टनिस्ट' आमिर खानने खुलासा केलाय की, मल्लिका शेरावतने 'दंगल' या सिनेमात भूमिका करण्यासाठी ऑडिशन दिली होती. कुस्तीपट्टू महावीर 

Updated: May 21, 2015, 07:26 PM IST
मल्लिकाला व्हायचं होतं आमिरची पत्नी! title=

मुंबई: बॉलिवूडचा 'मि. परफेक्टनिस्ट' आमिर खानने खुलासा केलाय की, मल्लिका शेरावतने 'दंगल' या सिनेमात भूमिका करण्यासाठी ऑडिशन दिली होती. कुस्तीपट्टू महावीर सिंह यांच्या जीवनावर आधारीत या सिनेमात मल्लिकाने महावीर यांच्या पत्नीच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं. आमिर या सिनेमात महावीर यांच्या भूमिकेत आहे.

आमिरने एका मुलाखतीत खुलासा केला की, 'मल्लिका एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने 'दंगल' सिनेमाच्या कास्टिंग डायरेक्टरशी संपर्क साधला होता आणि एका भूमिकेसाठी ऑडिशनही दिलं होतं. आमचं लक्ष आता गीता आणि बबीता यांच्या भूमिकेसाठी 12-14 वर्षांच्या बालकलाकरांच्या निवडीवर आहे.'

सिनेमात आमिरच्या मुलींच्या भूमिका कोण करणार यावर अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. त्यात कंगना राणावत, तापसी पन्नू, उर्वशी रोतेला या अभिनेत्रींची नावे समोर येत होती. 

आमिरने माहिती दिली की, आम्ही अनेक मुलींचे ऑडिशन घेतले, त्यातून फातिमा शेख आणि सानिया मल्होत्रा यांची निवड झाली. या दोघी खूप प्रभावशाली आहेत. या दोघीही कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. फातिमा सिनेमा आणि टीव्ही सिरिअल्समध्ये काम करते तर सानिया बॅले डान्सर आहे. या सिमेमाचं शूटिंग यावर्षी सप्टेंबर महीन्यात सुरू होणार आहे.   

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.