'बाहुबली- 2' मध्ये अमिताभ यांना करायचा होता रोल पण...

'बाहुबली 2' रिलीज होताच सिनेमाने देशभरात धमाल केली. अनेक रेकॉर्ड सिनेमाने मोडले. सिनेमाने बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. येणाऱ्या दिवसांमध्ये सिनेमा आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे करेल. पण एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अमिताभ बच्चन यांना देखील या सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा होती.

Updated: May 5, 2017, 12:46 PM IST
'बाहुबली- 2' मध्ये अमिताभ यांना करायचा होता रोल पण... title=

मुंबई : 'बाहुबली 2' रिलीज होताच सिनेमाने देशभरात धमाल केली. अनेक रेकॉर्ड सिनेमाने मोडले. सिनेमाने बॉलिवूडचे अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले. येणाऱ्या दिवसांमध्ये सिनेमा आणखी काही रेकॉर्ड आपल्या नावे करेल. पण एका वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार अमिताभ बच्चन यांना देखील या सिनेमामध्ये काम करण्याची इच्छा होती.

अमिताभ यांनी दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्याशी चर्चा देखील केली. पण राजमौली यांच्याकडे अमिताभ यांना द्यावा असा कोणताही रोल नव्हता. त्यामुळे अमिताभ या सिनेमाचा भाग नाही बनू शकले.

फक्त अमिताभच नाही तर श्रीदेवी हे देखील या सिनेमाचा भाग नाही बनू शकल्या. राजमाताच्या रोलसाठी राजामौली यांनी श्रीदेवी यांच्याशी चर्चा केली होती पण या रोलसाठी श्रीदेवी यांनी ६ कोटींची मागणी केली होती. यामुळे राजमौली यांनी हा रोल त्यांना दिला नाही.