व्हिडिओ : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा टीझर प्रदर्शित

दबंग अभिनेता सलमान खान याचा 'ट्युबलाईट' या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: May 5, 2017, 10:59 AM IST
व्हिडिओ : सलमानच्या 'ट्युबलाईट'चा टीझर प्रदर्शित  title=

नवी दिल्ली : दबंग अभिनेता सलमान खान याचा 'ट्युबलाईट' या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. 

टीझरमध्ये सलमान एका मंदगती व्यक्तीच्या भूमिकेत दिसतोय. 'यकीन एक ट्युबलाईट की तरह होता है, देर से जलता है, मगर जब जलता है तो फुल लाईट कर देता है' हा डायलॉग या सिनेमाकडे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसतोय.

टीझर पाहिल्यानंतर हा सिनेमा भारत - चीनच्या युद्धावर आधारित असल्याचं दिसतंय. चीनची एक महिला आणि तिचा मुलगा भारतात अडकतात... आणि सलमान तिची मदत करताना या सिनेमात दिसेल, असं काहीसं चित्र या टीझरमधून दिसतंय. 

या सिनेमात सोहेल खान एका आर्मी मॅनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर चीनी अभिनेत्री जू जू बॉलिवूडमध्ये आपलं पहिलं पाऊल टाकतेय.