जेव्हा KBC-8च्या कार्यक्रमात चिडले अमिताभ बच्चन...

केबीसी-8च्या पहिल्याच एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन नाराज झाले. सेटवर 'वंदे मातरम्' गाण्याच्या संगीतावर तालीम सुरू होती. यासाठी प्रेक्षकांना राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यास सांगितलं आणि नंतर बिग बींना प्रेक्षकांमध्ये जाण्यास सांगितलं, त्यामुळं ते चिडले.

Updated: Aug 3, 2014, 06:56 PM IST
जेव्हा KBC-8च्या कार्यक्रमात चिडले अमिताभ बच्चन... title=

सूरत,गुजरात: केबीसी-8च्या पहिल्याच एपिसोडच्या शूटिंग दरम्यान बिग बी अमिताभ बच्चन नाराज झाले. सेटवर 'वंदे मातरम्' गाण्याच्या संगीतावर तालीम सुरू होती. यासाठी प्रेक्षकांना राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यास सांगितलं आणि नंतर बिग बींना प्रेक्षकांमध्ये जाण्यास सांगितलं, त्यामुळं ते चिडले.

चि़डलेले बिग बी म्हणाले, "हे आमचं राष्ट्रगीत आहे आणि त्याचा सन्मान आपण केला पाहिजे. जर तुम्ही देशाचा सन्मान करू शकत नसाल तर मलाच या शोमधून बाहेर काढा."

छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या शोच्या आठव्या सिझनची धमाकेदार सुरुवात झालीय. याच कार्यक्रमाच्या शूटिंगदरम्यान हा प्रकार घडला. 

केबीसी-8च्या पहिल्या एपिसोडमध्ये कॉमेडीयन कपिल शर्माही उपस्थित असेल. त्यानं बिग बींसोबत खूप मस्ती केलीय. तसंच हा एपिसोड सूरतमध्ये शूट केला गेलाय. पहिल्या एपिसोडची विजेती ठरली दीपा जगतियानी. तिनं 6.40 लाख रुपये जिंकले. यावेळी केबीसीमध्ये सर्वाधिक 7 कोटी रुपये जिंकता येईल. तसंच काही नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. 
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.