‘राम-लीला’ विवाहबंधनात अडकण्यास तयार!

सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या अफेअरविषयी चर्चा जोरावर आहे. या दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांचं एकमेकांसोबत असणंच सगळं काही सांगून जातं. 

Updated: Aug 3, 2014, 02:46 PM IST
‘राम-लीला’ विवाहबंधनात अडकण्यास तयार! title=

मुंबई : सध्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादूकोण यांच्या अफेअरविषयी चर्चा जोरावर आहे. या दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी अनेकदा त्यांचं एकमेकांसोबत असणंच सगळं काही सांगून जातं. 

मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका – रणवीर लवकरच लग्नाच्या बंधनात अडकण्याचा विचार करत आहेत. या दोघांच्याही जवळचा मानला जाणारा बॉलिवूडच्या एका डायरेक्टरनं दिलेल्या माहितीनुसार रणवीर – दीपिका दोघंही आपल्या या संबंधांबद्दल खूप सीरियस आहेत. 

सध्या, रणवीर सिंग जोय अख्तर हिचा आगामी सिनेमा ‘दिल धडकने दो’मध्ये व्यस्त आहे. या सिनेमाची शूटींग इस्तानबूलमध्ये सुरू आहे. तिथंच अचानक दीपिकाही धडकली. याच सेटवर उपस्थित असलेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिका इथं केवळ रणवीरला भेटण्यासाठीच उपस्थित झाली होती. 

या दोघांनीही कधीही आपल्या नातेसंबंधांची जाहीर कबुली दिलेली नाही. तरी दोघंही आपल्या दोघांत चांगली मैत्री असल्याचा दावा करतात. पण, एकमेकांबाबतीत भावनांना मात्र ते लपवू शकलेले नाहीत.

या दोघांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपिका-रणवीर पुढच्याच वर्षी म्हणजे 2015 पर्यंत लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहेत.    

रणवीर – दीपिकानं संजय लीला भन्साळी यांच्या ‘राम-लीला’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. याच सिनेमाच्या शूटींगदरम्यान या दोघांचं सूत जुळल्याचं सांगितलं जातं.  

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.