अमृताशी लग्न केल्यानंतर अनमोलला 'लॉटरी'

नुकताच अभिनेत्री अमृता राव हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलेल्या अनमोलला 'लॉटरी' लागली असंच म्हणावं लागेल. 

Updated: Jun 3, 2016, 05:52 PM IST
अमृताशी लग्न केल्यानंतर अनमोलला 'लॉटरी' title=

मुंबई : नुकताच अभिनेत्री अमृता राव हिच्यासोबत विवाहबंधनात अडकलेल्या अनमोलला 'लॉटरी' लागली असंच म्हणावं लागेल. 

आरजे म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अनमोल आता लवकरच टीव्हीवरही दिसणार आहे. लवकरच 'अॅन्ड टीव्ही'वर दाखल होणाऱ्या 'लाईफ का रिचार्ज' या कार्यक्रमाचं होस्टींग करताना अनमोल दिसेल.

कार्यक्रमाशी निगडीत सूत्रांच्या माहितीनुसार, अनमोलला कार्यक्रमाच्या होस्टींगचा प्रस्ताव देण्यात आलाय. यासंबंधी अनमोलशी चर्चाही सुरू आहे. या कार्यक्रमाचं बरचसं शुटींग जयपूरमध्ये केलं जाणार आहे. 

सोशल मीडियावर केंद्रीत हा कार्यक्रम असेल... लोकांना हसवण्यासाठी व्यंगाच्या माध्यमातून या कार्यक्रमात भाष्य केलं जाईल, अशी माहिती मिळतेय. अमृताही याच चॅनलवर 'मेरी आवाज ही पहचान है' या कार्यक्रमातून प्रेक्षकांना दिसतेय. सात वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर हे जोडपं नुकतंच विवाहबंधनात अडकलंय.