मीडियाचा शाहरूखच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या पत्रकार परिषदेवर चेन्नईतल्या पत्रकारांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी शाहरूख आणि ‘हॅपी न्यू इअर’चे दुसरे कलाकार एक-दोन नाही तर तब्बल चार तास उशीरानं पत्रकार परिषदेला आले. त्यामुळं चिडलेल्या पत्रकारांनी पत्रकार परिषद सोडून दिली. 

Updated: Oct 5, 2014, 10:01 AM IST
मीडियाचा शाहरूखच्या पत्रकार परिषदेवर बहिष्कार title=

चेन्नई: बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या पत्रकार परिषदेवर चेन्नईतल्या पत्रकारांनी बहिष्कार घातला. शुक्रवारी शाहरूख आणि ‘हॅपी न्यू इअर’चे दुसरे कलाकार एक-दोन नाही तर तब्बल चार तास उशीरानं पत्रकार परिषदेला आले. त्यामुळं चिडलेल्या पत्रकारांनी पत्रकार परिषद सोडून दिली. 

शाहरुख दीपिका पदुकोण, अभिषेक बच्चन, बोमन ईराणी आणि सोनू सूद सोबत इथं येणार होता. त्यासाठी पत्रकारांना ४.३०ची वेळ देण्यात आली होती आणि त्यानुसार मीडियातील लोक तिथं पोहोचले होते. 

नंतर जवळपास रात्री आठनंतर आयोजकांनी त्यांच्या उशीरा येण्याचं कारण सांगितलं. पत्रकार परिषदेला उशीर का होतोय असं जनसंपर्क अधिकाऱ्याला विचारलं असता, त्यानं तुम्ही वेळेवर का आलात, असा प्रतिप्रश्न विचारला. त्यामुळं सर्व लोक नाराज झाले.  

शाहरुखनं नंतर पत्रकारांना मनवण्याचे पयत्न केले, पण यानं काहीच फरक पडला नाही. शाहरुखनं प्रत्येकाला वेगळी मुलाखत देण्याचंही आश्वासन दिलं. पण नाराज पत्रकारांनी तिथून निघून जाणंच पसंत केलं. 

खरं तर प्रत्येकाचा वेळ हा खूप महत्त्त्वाचा मग तिथं अशाप्रकारे लोकांना तात्काळत ठेवून चार-चार तास उशीरानं येणं योग्य आहे का?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.