पत्रकाराच्या आईला अनुष्का शर्मा फोनवर थेट म्हणाली...

अभिनेत्री अनुष्का शर्मा एका पत्रकार परिषदेत, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 13, 2017, 08:08 PM IST

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा एका पत्रकार परिषदेत, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देत होती. अचानक न्यूज चॅनेल्सच्या पत्रकारांनी अनुष्कासमोर ठेवलेल्या माईक्सजवळ एक फोन वाजू लागला, मुलाखत रेकॉर्ड करण्यासाठी एका महिला पत्रकाराने तो फोन तिथे ठेवला होता.

त्या महिला पत्रकाराला आईचा फोन येत होता, त्यावर मॉम कॉलिंग पाहिल्यावर अनुष्काने तो मोबाईल फोन हातात घेऊन, कॉल रिसिव्ह केला, आणि सांगितलं, आन्टी में अनुष्का शर्मा बात कर रही हूँ, कृतिका अनुष्का का इन्टरव्ह्यूव्ह ले रही है, ओ आपको बाद में फोन करेगी. आणखी अनुष्का फोनवर बोलताना म्हणाली, हाँ आंटी ओ, अनुष्का शर्माका इन्टरव्ह्यूव्ह ले रही है, बाद मे आप को फोन करेगी...

एवढं बोलून अनुष्काने खाली फोन ठेवला आणि सांगितलं, आन्टी बोल रही थी बेटा बाद में कृतिका को फोन लौटा देना...