मुंबई : रणवीर सिंग आणि अनुष्का शर्मा बॅंड बाजा बारात या सिनेमाच्या वेळी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र, आता या सगळ्या गोष्टींना या दोघांनी पूर्णविराम दिलाय.
रियल लाईफमध्ये खरंतर या जोडीमध्ये चांगलीच मैत्री आहे... आणि म्हणूनचं अनुष्कानं रणवीरला थेट त्याचा ड्रेसिंगस सेन्स बदलण्याचा सल्ला दिलाय.
रणवीर सिंग जरी बॉलिवूडचा इंटरटेनर नंबर वन असला तरी त्याला अजिबात ड्रेसिंग सेन्स नाहीय, असं आम्ही नाही तर त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अनुष्का शर्माने म्हंटलय.
शाहिद कपूरच्या बर्थ़डे पार्टीच्या वेळी रणवीरने घातलेल्या ड्रेसवर अनुष्काने निशाना साधला. सोशल साईट्सवरही रणवीरच्या ड्रेसिंग सेन्सची खिल्ली उडवली होती. रणवीरने याआधीही त्याच्या विचित्र फॅशनने त्याच्या फॅन्सना धक्का दिला होता.
...असो आम्ही तर रणवीरला हाच सल्ला देतोय की 'बेफिक्रे' होणं चांगली गोष्ट आहे पण अशा पद्धतीचा ड्रेसिंग सेन्स करणं चांगली गोष्ट नाही... आता रणवीर अनुष्काचा तरी सल्ला ऐकतो का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.