'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये अर्जुन-श्रद्धाचा साखरपुडा

बॉलीवूड अभिनता अर्जुन कपूरने साखरपुडा केलाय. त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याशी साखरपुडा केलाय. सगळ्या विशेष बाब म्हणजे हा साखरपुडा राजस्थानच्या मंडावा येथे झालाय. यांच्या साखरपुड्यात प्रमुख पाहुणे होते तेथील गावातील नागरिक.

Updated: Jul 10, 2016, 10:33 AM IST
'हाफ गर्लफ्रेंड'मध्ये अर्जुन-श्रद्धाचा साखरपुडा title=

मंडावा : बॉलीवूड अभिनता अर्जुन कपूरने साखरपुडा केलाय. त्याने अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याशी साखरपुडा केलाय. सगळ्या विशेष बाब म्हणजे हा साखरपुडा राजस्थानच्या मंडावा येथे झालाय. यांच्या साखरपुड्यात प्रमुख पाहुणे होते तेथील गावातील नागरिक.

तुम्हीही हे वाचून हैराण झालात ना. दरम्यान हा साखरपुडा रीअल नाही तर रील लाईफमध्ये झालाय. मोहित सुरी दिग्दर्शित हाफ गर्लफ्रेंडचे शूटिंग सध्या मंडावा येथे सुरु आहे. 

शुक्रवारी अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या साखरपुडा सोहळ्याचे शूटिंग पार पडले. हा साखरपुडा पूर्णपणे पारंपारिक पद्धतीने करण्यात आला. यावेळी गावातील नागरिक शूटिंग पाहण्यासाठी उपस्थित होते.