मुंबई : अरविंद स्वामी हा अभिनेता १५ वर्षानंतर बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार आहे. मणिरत्नमच्या रोजा चित्रपटाच्या माध्यमातून अरविंद स्वामीने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये प्रवेश केला होता.
दिग्दर्शक तनुज भरमार यांच्या 'डीअर डॅड' चित्रपटातून पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यास अरविंद स्वामीने तयारी सुरु केली आहे. हा चित्रपटाचं पोस्टर १ एप्रिल रोजी रिलीज करण्यात आलं.
डिअर डॅड हा वडिल आणि मुलाच्या नात्यावर भाष्य करणार चित्रपट आहे. चित्रपटात वडिल आणि मुलाचा दिल्लीपासून ते मसुरीपर्यंतचा प्रवास दाखवला जाणार आहे.
अशा प्रकारचे चित्रपट फार कमी बनतात, ही कथा लोकांना सांगणं गरजेचं आहे. मी या चित्रपटात वडिलांची भूमिका बजावणार आहे', अशी माहिती अरविंद स्वामीने दिली आहे.
दिग्दर्शक तनुज भरमार यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाची कथा आवडल्याने हा चित्रपट करण्याच निर्णय घेतल्यांच अरविंद स्वामीने सांगितलं आहे.