अखेर आतिफ अस्लमचा नियोजित कार्यक्रम रद्द...

पुण्यात आयोजित करण्यात आलेला पाकिस्तानी कलाकार आतिफ अस्लम याचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आलाय. 

Updated: Apr 21, 2015, 01:36 PM IST
अखेर आतिफ अस्लमचा नियोजित कार्यक्रम रद्द... title=

पुणे : पुण्यात आयोजित करण्यात आलेला पाकिस्तानी कलाकार आतिफ अस्लम याचा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आलाय. 

पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचा कार्यक्रम रद्द न केल्यास तो उधळून लावण्याचा इशारा शिवसेनेनं दिला होता. शिवसेनेची भावना लक्षात घेऊन तसंच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिलीय. 

भारतात दहशतवादी कारवाया करून अस्थिरता निर्माण करणाऱ्या पाकिस्तानातल्या कलाकाराचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी चित्रपट सेनेनं केली होतीय. त्यावर एक पाऊल मागे घेत आयोजकांनी हा कार्यक्रमच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं या कार्यक्रमाचे प्रायोजक अंजनेय साठे यांनी म्हटलंय. 

येत्या २५ एप्रिल रोजी पुण्यातीलअमानोरा पार्क इथं आतिफचा हा लाईव्ह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  अंजनेय साठे ग्रुप आणि एक्सटसी बिझनेस सोल्युशन्सतर्फे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.