ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं आहे, पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आत्माराम भेंडे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आत्माराम भेंडे यांनी नाट्य संमलेनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

Updated: Feb 7, 2015, 08:42 AM IST
ज्येष्ठ रंगकर्मी आत्माराम भेंडे यांचं निधन title=

पुणे : ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे यांचं वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झालं आहे, पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आत्माराम भेंडे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आहे. आत्माराम भेंडे यांनी नाट्य संमलेनाचं अध्यक्षपदही भूषवलं होतं.

सहा दशकांहून अधिक काळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता म्हणून कार्यरत असणाऱ्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून कारर्कीद सुरू केली. 

विनोदी अभिनेते आणि लेखक बबन प्रभू यांच्याबरोबर त्यांनी अनेक दर्जेदार विनोदी, फार्सिकल नाटके रंगभूमीवर आणली. या जोडीने दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, पिलूचं लग्न आदी अनेक नाटके गाजवली.

अभिनेता म्हणून भेंडे यांनी मन पाखरू पाखरू, प्रीती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, पळा पळा कोण पुढे पळे अशा नाटकांतून कौशल्य दाखवले. मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी कर्तृत्व गाजवले. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.