शाहिद आफ्रिदीसोबत तसं झाल्याची कबुली देणाऱ्या अर्शी खानविरुद्ध फतवा

पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध होते, असा ट्विटरवरून खुलासा करणाऱ्या भारतीय मॉडेल अर्शी खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय. मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या स्थानिक न्यूज चॅनेलनं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केलाय की, अर्शी खान विरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय.

Updated: Nov 2, 2015, 07:40 PM IST
शाहिद आफ्रिदीसोबत तसं झाल्याची कबुली देणाऱ्या अर्शी खानविरुद्ध फतवा title=

मुंबई: पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीसोबत शारीरिक संबंध होते, असा ट्विटरवरून खुलासा करणाऱ्या भारतीय मॉडेल अर्शी खानविरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय. मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तानच्या स्थानिक न्यूज चॅनेलनं आपल्या रिपोर्टमध्ये दावा केलाय की, अर्शी खान विरुद्ध फतवा जारी करण्यात आलाय.

आणखी वाचा - 'ड्रामेबाज' अर्शी शाहिद आफ्रिदीसाठी न्यूड व्हायलाही तयार!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्शीच्या ट्विटमुळे पाकिस्तान आणि इस्लामचा अपमान झाल्यानं हा फतवा जारी केल्याचं सांगण्यात येतंय. सध्या मुंबईत राहणारी अर्शी खान मूळची पाकिस्तान-अफगाणिस्तानची आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान बॉर्डरवर असलेल्या मदरश्याकडून हा फतवा जारी करत दोन्ही देशातील मुस्लिम समुदायाला अपिल करण्यात आलीय की, अर्शी खानला इस्लामच्या अपमानाची शिक्षा व्हायला हवी. म्हणून तिला गर्दीसमोर न्यूड फोटोशूट करण्याची शिक्षा देण्यात यावी.  

काही महिन्यांपूर्वी अर्शी आणि शाहिदनं दुबईच्या एका सप्ततारांकीत हॉटेलमध्ये एकत्र वेळ घालवला होता. यावर अर्शीनं सुरुवातीला ट्विट केलं होतं, ती आणि शाहिद चांगले मित्र आहेत. मात्र काही दिवसांनंतर अर्शी खाननं ट्विटरवरून आपण शाहिद खान सोबत शारीरिक संबंध ठेवल्याचं सांगितलं. अर्शी खानचं हे ट्विट सोशल मीडियावर वायरल झालं होतं.

आणखी वाचा - अभिनेत्री अर्शी खानने कबूल केले मी शाहिद आफ्रिदीशी प्रेम करते, ठेवला लग्नाचा प्रस्‍ताव

फतव्याबाबत प्रतिक्रिया देत अर्शी खाननं ट्विट केलंय, 'पाकिस्तानपासून मी खूप निराश आहे. फतव्याविरुद्ध कुणीही माझ्या बाजूनं काहीही बोललं नाही. जागो पाकिस्तान', असं म्हणत तिनं पाकिस्तान आणि आफ्रिदीच्या ट्विटर हँडलला टॅग केलंय. मला कुणाची भीती नाही, अल्लाह माझं रक्षण करेल, मी न शिवसेनेला घाबरत, ना ही मुफ्तीला... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.