बाहुबली 1 ची ३ दिवसात ३ कोटींची कमाई

बाहुबली 2 हा सिनेमा येण्याआधी बाहुबली 1 पुन्हा रिलीज करण्यात आला होता, पण बाहुबली 1 ला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 10, 2017, 04:04 PM IST
बाहुबली 1 ची ३  दिवसात ३ कोटींची कमाई title=

मुंबई : बाहुबली 2 हा सिनेमा येण्याआधी बाहुबली 1 पुन्हा रिलीज करण्यात आला होता, पण बाहुबली 1 ला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. या पहिल्या चित्रपटाने ३ दिवसात ३ कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे, जो फारच कमी आहे.येत्या 28 एप्रिलला ‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

‘बाहुबली : द बिगिनिंग’ 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झाला होता. तो पुन्हा रिलीज करण्यात आला आहे.‘कटप्पाने बाहुबलीला का मारलं?’ या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या भागात मिळणार आहे. मात्र त्यासाठी आतुर झालेल्या प्रेक्षकांना पुन्हा पहिला भाग पाहण्याची इच्छा प्रेक्षकांना नसावी. 

बाहुबलीचा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्यावेळी पहिल्या तीन दिवसांतच सिनेमाने 90 कोटींचा गल्ला जमवला होता. मात्र आता बाहुबली १ रिलीज करण्यात आला तेव्हा या चित्रपटाने फक्त ३ कोटी रूपयाचा गल्ला ३ दिवसात जमवला. डीएनए या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.