सैराट फेम आकाश ठोसरच्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

सैराट फेम आकाश ठोसरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. बॉलीवूडचा दबंग खान सलमानने ट्विटवरुन हा फर्स्ट लूक रिलीज केलाय.

Updated: Apr 10, 2017, 01:37 PM IST
सैराट फेम आकाश ठोसरच्या सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज

मुंबई : सैराट फेम आकाश ठोसरच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज झालाय. बॉलीवूडचा दबंग खान सलमानने ट्विटवरुन हा फर्स्ट लूक रिलीज केलाय.

सलमानने हा फोटो ट्विटरवरुन शेअर करताना म्हटलेय की सैराट फेम आकाश ठोसर परत येतोय. 

सैराटमधून रातोरात स्टार बनलेला आकाश आता आगामी महेश मांजरेकर यांच्या एफयू या सिनेमात दिसणार आहे. सैराटमधून त्याची परश्या म्हणून ही ओळख बनली होती. या नव्या सिनेमातून तो नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. 

येत्या २ जूनला हा सिनेमा रिलीज होतोय. आकाश ठोसरसोबत या सिनेमामध्ये संस्कृती बालगुडेचीही भूमिका असणार आहे.