मुंबई : दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता खुलासा झाला आहे की कटप्पाने बाहुबलीला का मारले. आम्ही या ठिकाणी का मारले हे सांगणार नाही. पण ज्यांनी चित्रपट पाहिला त्यांना नक्की कारण कळाले असे. आता चित्रपट पाहिलेल्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की बाहुबलीचा पार्ट ३ येणार का?
याचं उत्तर हो असू शकते. अशी अनेक कारणे आहे की या चित्रपटाचे निर्माते तिसरा भाग बनवू शकतील. बाहुबली २च्या ज्या मुलाखती झाल्या त्यात पार्ट ३ बद्दल स्पष्ट शद्बात दिग्दर्शक राजामौली यांनी नकार दिलेला नाही.
सध्या या चित्रपटाचा तिसरा पार्ट होणार की नाही याचं प्लॅनिंग नाही. पण तिसरा पार्ट होणार याचे ५ पुरावे आमच्याकडे आहेत.
ज्यांनी चित्रपट पाहिला असेल किंवा जे पाहणार असतील त्यांनी याकडे लक्ष द्यावे. महिष्मतीच्या सिंहासनावर बसल्यावर महेंद्र बाहुबलीचे वचन दिले की मेरा वचन ही है शासन.
त्याशिवाय शेवटी कास्टींग रोल होताना काही वेळ थांबविण्यात आली. एका मुलाच्या आवाजात प्रश्न विचारण्यात आला. यानंतर माहिष्मतीवर शासन कोणी केले. महेंद्र बाहुबली आणि त्यांच्या मुलांचे राज्य होते... यावर बाहुबलीतील संन्यासीच्या आवाजात उत्तर येते की शिव की मर्जी मैं क्या जानू... त्यामुळे आता चित्रपटाचा हाईप आणि क्रेझ पाहून संपूर्ण चान्सेस आहेत की याचा सिक्वल बनू शकतो. त्यामुळे पुढील दोन वर्षात आपल्याला तिसरा भाग पाहायला मिळू शकतो.
बाहुबली २ च्या शेवटी भल्लाल देव यांचा अंत होतो पण बिज्जल देव याची भूमिका जिवंत ठेवली आहे. तो महेंद्र बाहुबलीच्या राज्यभिषेकाला उपस्थित असतो पण बाहुबली आणि बाहुबली २ पाहून आपल्या अंदाज आलाच असेल की तो शांत बसणाऱ्यांपैकी नाही.
तसेच कटप्पाच्या भूमिकेत इतका दम आहे की त्याला पार्ट ३ मध्ये कायम ठेवता येईल. कोण जाणे यात कटप्पाचा भूतकाळ दाखविला जाऊ शकतो.
बाहुबलीमध्ये महेंद्र बाहुबलीच्या प्रेमिकेच्या भूमिकेत तमन्ना भाटीयाला दाखविण्यात आले. पण या चित्रपटात तिची एक झलक दाखवली आहे. तिच्या फॅन्सने पापणी बंद करत नाही तो पर्यंत ती गायब झालेली दिसली आहे. त्यामुळे पुढील पार्टमध्ये या दोघांचे लग्न दाखविण्याची शक्यता आहे. बाहुबली २ मध्ये महेंद्र आपल्या आई देवसेनेला भेटला. प्रेमिका अवंतिकाला भेटला नाही. त्यामुळे बाहुबली ३ला संपूर्ण स्कोप आहे.
बाहुबलीचा पहिला पार्ट असो की दुसरा तांत्रिकदृष्ट्या हा चित्रपट हॉलिवूडला टक्कर देणार आहे. त्यामुळे हॉलिवूडचे जसे सिक्वल निघतात तसेच फॉलो होण्याची शक्यता आहे. त्यात फास्ट अँड फ्युरिअसचे अनेक भाग झाले तसेच बाहुबलीची होण्याची शक्यता आहे. तसेच करण जौहर सारखा निर्माता मार्केटचा जाणकार असून तो या नावाला इन्कॅश करू शकतो.