मुंबई : वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सेलिब्रेशनचा दिवस. प्रत्येक जण नानापद्धतीने हा दिवस साजरा करत असतो. अनेक बॉलीवूड कलाकार तर सेलिब्रेशनसाठी परदेशात गेलेत. बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासूनेही खास पद्धतीने हे सेलिब्रेशन केलेय. तिने तिचा बॉयफ्रेंड करण सिंग ग्रोवरसह हे सेलिब्रेशन केलेय. याबाबतचे फोटोही तिने तिच्या ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.