'बाजीराव मस्तानी'ची 'अवॉर्ड'वर ही बाजी

बाजीराव मस्तानी हा सिनेमा रिलीज होऊन ५ दिवसचं झालेत. पण गिल्ड अॅवार्डमध्ये या सिनेमाने तब्बल ९ अॅवॉर्ड पटकावले आहे. 

Updated: Dec 23, 2015, 07:12 PM IST
'बाजीराव मस्तानी'ची 'अवॉर्ड'वर ही बाजी title=

मुंबई : बाजीराव मस्तानी हा सिनेमा रिलीज होऊन ५ दिवसचं झालेत. पण गिल्ड अॅवार्डमध्ये या सिनेमाने तब्बल ९ अॅवार्ड पटकावले आहे. 

बेस्ट अॅक्टर अॅवॉर्ड 'बाजीराव' रणवीर सिंगने पटकावला. तर दीपिकाही बेस्ट अॅक्ट्रेस ठरली. पण दीपिकाला हा अॅवॉर्ड पिकू सिनेमासाठी मिळाला. बाजीराव मस्तानीचे डायरेक्टर संजय लीला भंसाली यांना बेस्ट डायरेक्टर अॅवॉर्ड मिळाला.

बेस्ट सिनेमोटोग्राफी, बेस्ट साऊंड डिझाईन, बेस्ट कॉस्ट्यूम डिझाईन, बेस्ट कोरियोग्राफी, बेस्ट डायलॉग आणि बेस्ट सपोर्ट‍िंग रोल या अॅवॉर्डवरही बाजीराव मस्तानीने आपलं नाव कोरलं.

सलमान खानच्या बजरंगी भाईजानला 4 अॅवॉर्ड मिळाले, तर बेस्ट डेब्यू अॅक्टरचा अॅवॉर्ड कपिल शर्माला देण्यात आला.