'बाजीराव मस्तानी' आहे अद्भूत, अजून नशा उतरले नाही - बिग बी

 अमिताभ बच्चन यांनी संजय लीला भंसाली यांच्या 'बाजीराव मस्तानी'चे तोंडभरून कौतुक केले आहे. हा चित्रपट पाहिल्यापासून अजून त्यांच्या डोक्यातून 'बाजीराव मस्तानी'ची नशा उतरली नाही, असल्याचे गौरौद्गार काढले आहेत. 

Updated: Dec 23, 2015, 06:35 PM IST
 'बाजीराव मस्तानी' आहे अद्भूत, अजून नशा उतरले नाही - बिग बी  title=

मुंबई :  अमिताभ बच्चन यांनी संजय लीला भंसाली यांच्या 'बाजीराव मस्तानी'चे तोंडभरून कौतुक केले आहे. हा चित्रपट पाहिल्यापासून अजून त्यांच्या डोक्यातून 'बाजीराव मस्तानी'ची नशा उतरली नाही, असल्याचे गौरौद्गार काढले आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी ट्विटर लिहिले की ' बाजीराव मस्तानी' सोबत खूप चांगला वेळ गेला. कलाकारांनी कॅमेऱ्यासमोर असाधारण प्रतिभा दाखविली आहे. एका शब्दात सांगायचे झाले तर 'अद्भूत' याची नश अजून उतरली नाही - बाजीराव

अमिताभ बच्चन यांना 'दिलवाले' चित्रपटही पाहायचा आहे. पण त्यांनी अजून पाहिला नाही.