दीपिका-रणवीरनं लॉन्च केलं 'बाजीराव मस्तानी'चं गाणं 'गजानन'!

अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहनं गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी आपला आगामी चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मधील पहिलं गाणं लॉन्च केलंय. गणपती बाप्पावरील हे गाणं गजानन गायक सुखविंदर सिंहनं गायलंय.

Updated: Sep 16, 2015, 02:07 PM IST
दीपिका-रणवीरनं लॉन्च केलं 'बाजीराव मस्तानी'चं गाणं 'गजानन'! title=

पुणे: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहनं गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी आपला आगामी चित्रपट 'बाजीराव मस्तानी'मधील पहिलं गाणं लॉन्च केलंय. गणपती बाप्पावरील हे गाणं गजानन गायक सुखविंदर सिंहनं गायलंय.

पुण्यात झालेल्या कार्यक्रमात जवळपास पाच हजार लोकांनी मानवी साखळीद्वारे गणेशाची आकृती तयार केली आणि आरती म्हटली. गायक सुखविंदर सिंहनं बाप्पाची आरती करून हे गाणं लॉन्च केलं.

चित्रपट निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांनी या चित्रपटावर काम करणं म्हणजे उत्तम आध्यात्मिक प्रवास म्हटलं. ते म्हणाले, गजानन ही आरती प्रेरणा देणारी आहे. 

गाणं ऐकण्यासाठी खालील Sound Track शब्दावर क्लिक करा -

बाजीराव मस्तानी चित्रपटात रणवीर सिंह बाजीराव पेशवा आणि दीपिका मस्तानीच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री प्रियंका चोप्रा बाजीरावची पत्नी काशीबाईची भूमिका साकारतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.