'बाजीराव'ने बादशहाला नमवलं

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले आणि संजय लीला भंसाळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानीने सिनेमात बॉक्स ऑफिसवर अजुनही टफ फाईट सुरु आहे. बाजीराव मस्तानीचं कलेक्शन वाढत चाललं असून या सिनेमाचे सोमवारचे कलेक्शन दिलवालेपेक्षा 40 टक्क्यांनी जास्त होते. 

Updated: Dec 23, 2015, 09:09 PM IST
'बाजीराव'ने बादशहाला नमवलं title=

मुंबई : रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि शाहरुख खान स्टारर दिलवाले आणि संजय लीला भंसाळी दिग्दर्शित बाजीराव-मस्तानीने सिनेमात बॉक्स ऑफिसवर अजुनही टफ फाईट सुरु आहे. बाजीराव मस्तानीचं कलेक्शन वाढत चाललं असून या सिनेमाचे सोमवारचे कलेक्शन दिलवालेपेक्षा 40 टक्क्यांनी जास्त होते. 

बाजीराव-मस्तानीने वर्ल्डवाईड 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सिनेमाने भारतात 60.80 कोटी आणि विदेशात 30 कोटींचा आकडा वीकेंडपर्यंत पार केला होता. सोमवारी या सिनेमाने 10.25 कोटींची कमाई करत एकूण 101.25 कोटींचा आकडा गाठला आहे. 

सिनेमा बॉक्स ऑफिसवर अजून चांगला व्यवसाय करेल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे दिलवालेच्या कमाईत 50 टक्के घट झाली आहे. बाजीराव-मस्तानीला माऊथ पब्लिसिटीचा फायदा झाला असून बाजीरावने बादशाहला चारही मुंड्या चित केले आहे. त्यामुळे बॉलिवूडचा किंग शाहरुखला नवख्या रणवीर सिंगने गुडघ्यावर बसविले अशी चर्चा बीटाऊनमध्ये रंगते आहे.