'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही'

उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावं असा इशारा मनसेनं दिला होता.

Updated: Sep 25, 2016, 09:00 PM IST
'पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही'

मुंबई : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडून जावं असा इशारा मनसेनं दिला होता. मनसेच्या या भूमिकेवर दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरनं प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालून दहशतवाद संपणार नाही. उरीमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे मलाही त्रास झाला आहे. नागरिकांचा राग मी समजू शकतो, पण यामुळे प्रश्न सुटणार नसल्याचं करण जोहर म्हणाला आहे.

करण जोहरचा ए दिल है मुश्किल हा चित्रपट 28 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान आहे. मनसेनं दिलेल्या इशाऱ्यामुळे करण जोहरच्या या चित्रपटावर टांगती तलवार कायम आहे.