बेगम करीनाचा शाही रुबाब

करीना कपूर-खानने भोपाळमध्ये नवाब सैफ अली खानच्या नातेवाइकांच्या लग्नाला हजेरी लावली. या लग्नात करीनाचं रूप चांगलंच खुलून आलं होतं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 11, 2013, 04:30 PM IST

www.24taas.com, भोपाळ
करीना कपूर-खानने भोपाळमध्ये नवाब सैफ अली खानच्या नातेवाइकांच्या लग्नाला हजेरी लावली. या लग्नात करीनाचं रूप चांगलंच खुलून आलं होतं. सगळ्यांचं लक्ष या सोहळ्यात करीना कपूरकडेच होतं. अत्यंत खानदानी पेहरावात करीना या सोहळ्यात आपली सासू शर्मिला टागोर हिच्यासह उपस्थित झाली.

करीना सध्या प्रकाश झा यांचा सत्याग्रह हा सिनेमा करत आहे. त्याच्या शुटिंगमधून वेळ काढून तिने या कार्यक्रमाला हजेरी लाली. मात्र कुटुंबाला महत्व देत या सोहळ्याला येताना तिने कपडेदेखील समारंभाला साजेसेच घातले. त्यामुळे करीनाचं सौंदर्य पाहून फोटोग्राफर्सनी तिचेच फोटो काढायला सुरूवात केली. करीना मात्र बेगमच्या रुबाबात सर्व नातेवाइकांशी आस्थेने बोलली. आणि आपली कौटुंबिक जबाबदारीही तितक्याच उत्साहाने पार पाडली.