Bigg Boss 9: सनी देओल आला पण सलमानसोबत शुटिंग न करता गेला निघून

 अभिनेता सनी देओल शनिवारी बिग बॉसच्या सेटवर आपला चित्रपट घायल द वन्स अगेन' च्या प्रमोशनसाठी आला होता. पण तो कोणतीही शुटिंग न करता सेटवरून माघारी गेला... नेमकं काय घडल ते आम्ही तुम्हांला सांगतो.... 

Updated: Dec 28, 2015, 07:42 PM IST
Bigg Boss 9: सनी देओल आला पण सलमानसोबत शुटिंग न करता  गेला निघून title=

लोणावळा :  अभिनेता सनी देओल शनिवारी बिग बॉसच्या सेटवर आपला चित्रपट घायल द वन्स अगेन' च्या प्रमोशनसाठी आला होता. पण तो कोणतीही शुटिंग न करता सेटवरून माघारी गेला... नेमकं काय घडल ते आम्ही तुम्हांला सांगतो.... 

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या सेटवर शाहरूख, काजोल आले होते. त्यामुळे हा बिग बॉसच्या इतिहासातील सर्वात चांगला एपिसोड झाला. प्रेक्षकांनाही खूप आवडला. या शनिवारी शाहरूखनंतर सनी देओल आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या सेटवर आला होता. 

तो लोणावळ्यात सांगितल्याप्रमाणे आला. आपल्या हॉटेलमध्ये चेक इन केले. वेळेनुसार तो ६ वाजता बिग बॉसच्या सेटवरही पोहचला. त्याने सलमान सोबत गप्पा मारल्या जेवण घेतले. दोन्ही स्टार आपल्या घरातील शिजवलेले अन्न शेअर केले. 

सनी देओल शुटिंग न करता परतला

सर्व काही चांगलं असताना सनी देओल शुटिंग न करता मुंबईला परतला. तो अपसेट झाला होता का? नाही झालं असं की.... शुटिंगला खूप उशीर झाला होता. बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये खूप वाद सुरू होता. या वादाचे शुटिंग सुरू होते. त्यामुळे सनी देओलला ६ ते १० वाजेपर्यंत वाट पाहावी लागली. त्यामुळे अती उशीर झाल्याने सनीला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्याने घऱी जाणे पसंत केले. 

सनी आता पुढील आठवड्यात आपल्या चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी जाणार आहे.