यंदाच्या 'बिग बॉस' विजेत्याचं बक्षीस किती आहे? जाणून घ्या...

'बिग बॉस' नववा सीझन दिवसेंदिवस रंगात येताना दिसतोय. यावेळचा 'डबल ट्रबल'चा फंडा प्रेक्षकांमध्येही अनेक प्रकारच्या उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झालाय, असं म्हणायला आता हरकत नाही. 

Updated: Oct 20, 2015, 05:54 PM IST
यंदाच्या 'बिग बॉस' विजेत्याचं बक्षीस किती आहे? जाणून घ्या...  title=

नवी दिल्ली : 'बिग बॉस' नववा सीझन दिवसेंदिवस रंगात येताना दिसतोय. यावेळचा 'डबल ट्रबल'चा फंडा प्रेक्षकांमध्येही अनेक प्रकारच्या उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झालाय, असं म्हणायला आता हरकत नाही. 

या आठवड्याच्या सुरुवातीचा 'निलामी टास्क'ही असाच उत्सुकता निर्माण करणारा ठरला. कैथ, सुयश, प्रिन्स आणि दिगंगना यांना आपापल्या बॅग परत मिळवण्यासाठी बोली लावण्यास सांगण्यात आलं... 

यातली खरी मेख म्हणजे, ही बोली कमीत कमी तीन लाखांपासून सुरु होणार होती... आणि हे चौघे जेवढी बोली लावतील ती सगळी रक्कम विजेत्याला मिळणाऱ्या रक्कमेतून वजा केली जाईल, असा नियमही यावेळी स्पष्ट करण्यात आला.

परंतु, सुयश, प्रिन्स आणि दिगंगना यांना हा नवीन नियम फारसा समजला नाही... आणि जास्तीत जास्त बोली लावणाऱ्याला त्याची बॅग परत मिळेल, असा त्यांचा समज झाला... आणि मग काय त्यांनी बोली लावायला सुरुवात केली. 

कैथनं मात्र आपण या खेळात सहभागी होणार नसल्याचं स्पष्ट केलं... आणि बॅगसाठी 'शून्य' बोली लावली. त्यामुळे, इतरांना बॅग मिळाली मात्र कैथला बॅगसाठी आणखी वाट पाहावी लागणार असं दिसतंय. 

पण, घरातल्या सगळ्यांना धक्का तेव्हा बसला जेव्हा विजेत्याला आता केवळ 39 लाख 66 हजार 667 रुपये मिळणार असल्याचं जाहीर करण्यात आलं... कारण, आता तिघांनी बोली लावलेली रक्कम या रक्कमेतून वजा करण्यात आलीय. 

आता, पाहायचंय पुढे काय होतंय... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.