मुंबई : बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी ठोठावण्यात आलेली ५ वर्षांची शिक्षा भोगून नुकताच सुटलेला अभिनेता संजय दत्त याने विशेष टाडा न्यायालयात धाव घेतलेय. त्याने आपला पासपोर्ट मिळविण्यासाठी न्यायालयात अर्ज केलाय.
दोषी ठरल्याने शिक्षा सुनावल्यानंतर सीबीआयने संजय दत्त याचा नवीन पासपोर्ट सीबीआयकडे जमा केला होता. तो आता परत मिळावा म्हणून त्याने हा अर्ज केला आहे. हा त्याचा शेवटचा अर्ज असावा.
न्यायालयाने या अर्जाला तुमची काही हरकत आहे का, असा सीबीआयचे वकील दीपक साळवी यांना सवाल केला. त्यावेळी अॅड. साळवी यांनी नकारार्थी उत्तर दिले. काल याबाबत निर्णय झाला नाही. आज निर्णय होण्याची शक्यता असून संजय दत्तला त्याला पासपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.