लग्नानंतर जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देणार कतरिना

सुप्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या काला चश्मा या सिनेमाच्या डान्समध्ये व्यस्त आहे. मात्र असे असले तरी जेव्हा तिच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा ती गंभीर होते. तसेच रणवीरसोबतच्या ब्रेकअपबाबतही ती अद्याप काही म्हणालेली नाहीये.

Updated: Aug 29, 2016, 11:44 AM IST
लग्नानंतर जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देणार कतरिना title=

मुंबई: सुप्रसिध्द अभिनेत्री कतरिना कैफ ही सध्या तिच्या काला चश्मा या सिनेमाच्या डान्समध्ये व्यस्त आहे. मात्र असे असले तरी जेव्हा तिच्या लग्नाचा विषय निघतो तेव्हा ती गंभीर होते. तसेच रणवीरसोबतच्या ब्रेकअपबाबतही ती अद्याप काही म्हणालेली नाहीये.

नुकत्याच घेण्यात आलेल्या मुलाखतीत तिला लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी लग्नासाठी आपण सिनेमात काम करणे सोडून देण्यास तयार असल्याचे कतरिनाने सांगितले. 

दरम्यान, यासाठी माझ्यावर कोणाचा दबाव नसेल, असे कतरिनाने पुढे सांगितले. लग्नानंतर संधी मिळाली तर मी नक्की चित्रपट करीन असंही तिने म्हटंल आहे.
लग्नानंतर जास्त वेळ आपल्या कुटुंबाला देण्याची इच्छा कतरिनाने मुलाखती दरम्यान व्यक्त केली.