दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने केलं लग्न!

अखेर रणवीर सिंग यांने आपली गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण हिच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न प्रत्यक्षात नाही. त्याचा आगामी सिनेमा  'फाइडिंग फॅनी' यात या दोघांनी लग्न केलं आहे.

Updated: Aug 20, 2014, 05:46 PM IST
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगने केलं लग्न!

मुंबई : अखेर रणवीर सिंग यांने आपली गर्लफ्रेंड दीपिका पादुकोण हिच्याशी लग्न केले. मात्र, हे लग्न प्रत्यक्षात नाही. त्याचा आगामी सिनेमा  'फाइडिंग फॅनी' यात या दोघांनी लग्न केलं आहे.

दीपिका आणि रणवीर यांच्या आगामी सिनेमाचे पोस्टरमध्ये दोघांचा एकत्र फोटो दिसत आहे. हे पोस्टर अजूनही लॉन्च झालेले नाही. या पोस्टरमध्ये दुल्हन झालेली दीपिका पांढऱ्या गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत आहे. तर रणवीर या सिनेमात छोटीशी भूमिका करीत आहे.

निर्देशक होमी अदजानिया याने दीपिका आणि रणवीर यांची लव्ह स्टोरी कॅश करण्यासाठी हे पोस्टर तयार केले आहे. मात्र, खऱ्या जीवनात दीपिका आणि रणवीर यांच्या लग्नाची प्रतिक्षा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.