प्रियंका चोपड़ा आणि ऋतिक रोशनचे शरीर अधिक आकर्षक : सनी लियोन

पॉर्न सिनेमांची दुनिया सोडून बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी सनी लिऑन आता व्यायामाचे धडे देत आहे. निरोगी जीवनशैली ठेवण्याबाबत ती सांगत आहे. याबाबतची तिची डीव्हीडी लॉन्च करण्यात आली. त्यावेळी ती म्हणाली अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांचे शरीर सेक्सी आहे.

Updated: Sep 15, 2015, 12:08 PM IST
 प्रियंका चोपड़ा आणि ऋतिक रोशनचे शरीर अधिक आकर्षक : सनी लियोन title=

बई : पॉर्न सिनेमांची दुनिया सोडून बॉलिवूडमध्ये आपला जलवा दाखविणारी सनी लिऑन आता व्यायामाचे धडे देत आहे. निरोगी जीवनशैली ठेवण्याबाबत ती सांगत आहे. याबाबतची तिची डीव्हीडी लॉन्च करण्यात आली. त्यावेळी ती म्हणाली अभिनेता ऋतिक रोशन आणि अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांचे शरीर सेक्सी आहे.

 'सुपर हॉट सनी मॉर्निग्स' या डीव्हीडी लॉन्च केली. त्यावेळी सनी म्हणाली, प्रियंकाचे शरीर अधिक आकर्षक आहे. मी विचार करीत आहे, माझेही शरीर तसे आर्कषक झाले पाहिजे. तर पुरुष अभिनेत्यांमध्ये ऋतिक रोशनचेही शरीर आकर्षक आहे.

सर्वच अभिनेता आणि अभिनेत्री आपल्या शरीराची काळजी घेत आहे. अधिक सुटसुटीत आणि आकर्षक दिसण्यासाठी ते विशेष लक्ष देतात. त्यासाठी व्यायाम म्हणजेच वर्कआऊट करण्याची गरज आहे. या सीडीतून आपले शरीर कसे सुटसुटती आणि आकर्षक ठेवायचे, याचे धडे मिळतील, असे सनीने म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.